शनीच्या साडेसातीची प्रत्येकाला भीती वाटते. प्रत्येकाला वाटते की त्याच्या /तिच्या आयुष्यात कधी साडेसाती येउ नये. पण साडेसाती कोणालाच टळलेली नाही. प्रत्येक राशीला साडेसाती ही असतेच. साडेसातीच्या भिती पोटी अनेकजण शनिवारी मारुतिच्या किंवा शनीच्या तरी मंदिरा समोर रांगेत उभे दिसतात.
सर्व प्रथम साडेसाती म्हणजे काय ते समजुन घेउया. इतर ग्रहांप्रमाणे शनी देखील आकाशमंडळात भ्रमण करत असतो. याकाळात तो प्रत्येक राशीत साधारण 2.5 (अडीच) वर्षे असतो. याकाळात ज्या व्यक्तीची ती चंद्र राशी असेल (जन्म पत्रीकेत चंद्र ज्या राशीत आहे ती राशी), त्या व्यक्तीला साडेसाती सुरु आहे असे म्हणतात.