शनीच्या साडेसातीची प्रत्येकाला भीती वाटते. प्रत्येकाला वाटते की त्याच्या /तिच्या आयुष्यात कधी साडेसाती येउ नये. पण साडेसाती कोणालाच टळलेली नाही. प्रत्येक राशीला साडेसाती ही असतेच. साडेसातीच्या भिती पोटी अनेकजण शनिवारी मारुतिच्या किंवा शनीच्या तरी मंदिरा समोर रांगेत उभे दिसतात.
सर्व प्रथम साडेसाती म्हणजे काय ते समजुन घेउया. इतर ग्रहांप्रमाणे शनी देखील आकाशमंडळात भ्रमण करत असतो. याकाळात तो प्रत्येक राशीत साधारण 2.5 (अडीच) वर्षे असतो. याकाळात ज्या व्यक्तीची ती चंद्र राशी असेल (जन्म पत्रीकेत चंद्र ज्या राशीत आहे ती राशी), त्या व्यक्तीला साडेसाती सुरु आहे असे म्हणतात.
आता एक प्रश्न असा उभा राहतो की शनी लग्न राशीत असल्यावर साडेसाती का नसते ?तो चंद्र राशीत असल्यावरच का असते ?
या प्रश्नाचे उत्तर समजले की साडेसातीत काय ते समजते :) या साठी आता आपण प्रथम चंद्राचे कारकत्व समजुन घेउया. चंद्र हा मनाचा व शरीरातील सर्व रसांचा कारक ग्रह आहे. आपण जो विचार करतो, स्वप्न बघतो, कल्पना-रंजन करतो ते सर्व चंद्राच्या अधिपत्याखाली येते.
आता शनीचा स्वभाव बघुया. शनी हा मृत्यु चा कारक ग्रह आहे. त्याला लांडी-लबाडी खपत नाही. त्याला खोटे बोललेले आवडत नाही. सेवा हा त्याचा धर्म आहे. तसेच कर्तव्यात कसुर केलेली पण त्याला आवडत नाही. याला खोटी स्तुती केलेली पण आवडत नाही. याला कष्ट आवडतात. याचे म्हणने आहे की तुम्ही सेवा करा फळाची अपेक्षा करु नका, योग्य समयी योग्य ते तो देतो. ज्योतीष शास्त्रानुसार एखादी घटना घडवतांना विलंब करतो पण नकार कधिच देत नाही.
आता साडेसाती मध्ये काय होते ते समजुन घेउया.साडेसाती मध्ये शनीचा संबंध तुमच्या चंद्र राशीशी म्हणजेच तुमच्या मनाशी येतो. त्यामुळे तुमच्या मनात जे काही चालले आहे ते सर्व शनी ला समजते, त्याचा पर्यंत पोचते. कोणताही वाईट विचार आधी आपल्या मनात येतो आणी मग तो आपण कृतीत उतरवतो. त्यामुळे सगळे वाईट व चागले हेतु शनीला समजतात. आपण कोणाची तोंडावर खोटी स्तुती करत असतो तेव्हा मनातुन त्याला शिव्या घालत असतो त्या सर्व शनी पर्यंत पोचतात.
हे सर्व शनीच्या स्वभाच्या विरुद्ध आहे. त्याल हे कधिच आवडत नाही. जर कोणी कष्ट न करता नुसतेच स्वप्नरंजन करत असेल तर ते याला रुचत नाही. आपल्या हातात काहीही नसतांना जो दुसर्याला आश्वासने देत असतो, त्याचा खोटेपणा याला रुचत नाही. दुसर्याची केलेली खोटी स्तुती पण याला आवडत नाही. आणी साडेसाती मध्ये जेव्हा आपण हे असे करतो ते सर्व थेट शनी पर्यंत पोचते. आणी मग शनी तुम्हाला तुमची जागा दखवतो. जो दिवास्वप्न बघत असतो त्याला शनी लगेच जमिनीवर आणतो. त्यामुळेच जर साडेसाती मध्ये तुम्ही समोरुन उद्या येणार्या पैश्यावर कोणाला आज शब्द दिलात तर उद्या येणारे पैसे अगदी शुल्लक कारणामुळे मिळत नाहीत आणी आपण तोंडघशी पडतो. होणारी कामे अगदी शुल्लक कारणाने पुढे ढकलली जातात. पण जेव्हा आपण एखादे काम होण्याची अपेक्षा सोडुन देतो व आपल्या कामाला लागतो, त्या कामाचा विचार करणेबंद करतो तेव्हा अनपेक्षीत पणे विनासयास ते काम पुर्ण होते.
आता तुम्हाला लक्ष्यात आले असेल की शनीच्या साडेसातीचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतो ते. शनीची साडेसाती असतांना तुम्ही खालील नियम पाळले तर याचा त्रास होत नाही.
1. कोणालाही खोटी आश्वासने देण्याचे टाळा.
2. उद्या होणार्या कामावर आज कोणालाही शब्द देण्याचे टाळा. जेव्हा प्रत्यक्ष हातात काही येईल तेव्हाच दुसर्याला शब्द द्या.
3. तुम्ही जे कार्य योजीले आहे त्या विषयी, त्या संबंधित व्यक्तींशीच चर्चा करा. इतरांशी त्याविषयी काहीही बोलायचे टाळा.
4. खोटे बोलायचे टाळा व इतरांच्या स्वत:संबंधीच्या अपेक्षा उंचावु नका.
5. वरील बर्याच गोष्टी रोजच्या जीवनात आचरनात आणणे कठीण असल्यामुळे, शक्यतो जास्त बोलण्याचेच टाळा.
जसे शनीला कोणाचीही खोटी स्तुती तसेच मस्का-पॉलीशी केलेली आवडत नाही तसेच त्याची केलेली सुद्धा आवडणार नाही. त्यामुळे शनीला जायचे की नाही ते तुम्हीच ठरवा.
पण जो कोणी दिवास्वप्न बघण्यात मशगुल आहे, कष्ट न करता खुप काही कमवण्याचे स्वप्न बघतो आहे, शनी साडेसातीमध्ये त्याला त्याची खरी जागा दाखवतो, त्याला जमीनीवर आणतो. वरील नियमांचे पालन केल्यास शनी त्रास देत नाही, किंबहुना कार्यात मदतच करतो असा माझा अनुभव आहे.
जर जन्म पत्रिके मध्ये शनीचा कोणत्याही कारणाने चंद्रशी संबंध येत असेल तर ती आयुष्यभरासाठी लागलेली साडेसाती असे समजावे व वरील नियमांचा काटेकोर पणे पालन करावे.
How deal with Sadesati solutions, are good eye openers and useful in day to day Life.
ReplyDeletethanks Archana for visiting this blog.
ReplyDeleteif you have any questions about astrology or anything related to astrology. do post them.
thanks and regards
nilesh.gawde
Thanks Niles for the very IMP & Usefull information.
ReplyDelete--
Thanks & Regards,
Yogesh V Potadar,
Really Usefull information.
ReplyDeleteइतर ग्रहांप्रमाणे शनी देखील आकाशमंडळात भ्रमण करत असतो. याकाळात तो प्रत्येक राशीत साधारण 2.5 (अडीच) वर्षे असतो. याकाळात ज्या व्यक्तीची ती चंद्र राशी असेल (जन्म पत्रीकेत चंद्र ज्या राशीत आहे ती राशी), त्या व्यक्तीला साडेसाती सुरु आहे असे म्हणतात.
ReplyDeleteHa rashit/janmapatriket chandra ani shani kasa check karta yeto.
Rgds,
Yogesh
योगेशजी नमस्कार!
ReplyDeleteसर्वप्रथम ब्लॉग वर आल्याबद्दल आणी लेख वाचल्याबद्द्ल धन्यवाद.
कृष्णमुर्ती पद्धती मध्ये साडेसाती मानत नाहीत. मात्र जन्मपत्रिके मध्ये शनी+चंद्र संबंध "पुनरफु" योग असे मानले आहे. हा सर्वात दुर्दैवी योग के.पी. मध्ये मानला आहे.
जन्मपत्रिके मध्ये शनीचा कोणत्याही कारणाने चंद्राशी संबंध आल्यास हा योग मानतात. चंद्र+शनी संबंध म्हणजे :
1. चंद्राच्या राशीत (कर्क) शनी असणे
2. शनीची चंद्रावर 3, 7 अथवा 10वी द्रुष्टी असणे
3. शनीच्या नक्षत्रात चंद्र असणे अथवा चंद्राच्या नक्षत्रात शनी असणे
4. शनीच्या राशीत चंद्र असणे
जन्मपत्रिकेतील वरिल कोणत्याही योगास "पुनरफु" योग (आयुष्याला लागलेली साडेसाती) असे संबोधीले आहे.
असा योग असलेल्या जातकाचे कोणतेही काम सहजासहजी पुर्ण होत नाही. तो जेव्हा एखाद्या कार्याची आशा सोडतो तेव्हा ते विनासयास पुर्ण होते.