नंतर सवडी प्रमाणे साधारण 2 आठवड्यानंतर मी पुण्याला माझ्या घरी या प्रश्नासाठी प्रश्नकुंडली मांडली. वेळ होती सकाळी 10.09 वाजता, 31/1/2005 रोजी.
- प्रश्नकुंडलीत पंचमात कर्क राशी, संतती संबंधी इच्छा दर्शविते, तसेच सप्तमातील चंद्र द्वितीय संतती दाखवतो. चंद्र प्रश्नांकीत भावांशी संबंधीत आहे.
- मीन लग्न असुन, लग्नेश गुरु सप्तमात. लग्नेशाची लग्नावर दृष्टी. लग्न बलवान - इच्छा पुर्ण होईल.
- पंचमाचा उप-नक्षत्र स्वामी बुध (द्वित्व) रविच्या नक्षत्रात बुध स्वत: लाभात असुन रवी सुद्धा लाभात स्थित आहे. त्यामुळे बुध लाभाचा बलवान कार्येश.
- बुधाची दृष्टी पंचमावर, तसेच संततीकारक गुरुची दृष्टी बुधावर व लाभावर 5वी दृष्टी.
- संततीचा कारक गुरु स्वत: सप्तमात (द्वितीय संतती).
- लाभाचा (इच्छापुर्ती) उप-नक्षत्र स्वामी सुध्दा बुधच.
वरिल सर्व गोष्टी, जातकास मनोवांच्छित द्वितीय संतती होईल असे दर्शवितात.
संतती कधी? ते महादशेवरुन सांगता येईल.
महादशा स्वामी चंद्र 7 । 5 स्वनक्षत्री. चंद्राचा उप-नक्षत्र स्वामी शुक्र रवीच्या नक्षत्रात व रवी लाभात.
चंद्र स्वनक्षत्री असल्यामुळे 7 (द्वितीय संतती) व 5 (संतती योग) चा बलवान कार्येश, तसेच संतती कारक गुरुच्या युतीत. गुरु व चंद्र दोन्ही सप्तमात (द्वितीय संतती) असुन, गुरु मंगळाच्या नक्षत्रात. मंगळ 9 । 2, 9. गुरु मंगळामुळे कुटूंब स्थानाचा कार्येश. गुरुची 5वी दृष्टी लाभस्थानावर व 7वी दृष्टी लग्नावर व गुरु स्वत: लग्नेश.
म्हणजेच चंद्र महादशेत संतती होणार (1/1/2006 दशा समाप्ती)
चंद्र महादशेतील अंतर्दशेचा विचार करतांना 11:36 मि.चे रुलींग घेतले ते या प्रमाणे (लग्न:मेष-मंगळ+राहु, लग्न-नक्षत्र: केतु, नक्षत्र: चंद्र, राशी:बुध, वार: चंद्र)
शुक्र रुलींग मध्ये नसल्यामुळे व शुक्र षष्टाचा (7चे व्यय) कार्येश असल्यामुळे, शुक्र अंतर्दशा सोडावी लगेल.
पुढे येणारी अंतर्दशा रवीची असुन पत्रिकेत रवी स्वत: लाभात. रवी चंद्राच्या श्रवण (सेवाभावी संतती) नक्षत्रात असुन चंद्र 7 व 5 चा बलवान कार्येश, संतती कारक गुरुच्या युतीत सप्तमात. सप्तमातील गुरुची रवीवर व लाभावर 5वी दृष्टी. यामुळे रुलींग मध्ये नसुन देखील रवी अंतर्दशेत संतती होण्यास हरकत नाही असे वाटले व अंतर्दशा रवीची निवडली. (1/7/2005 ते 1/1/2006) .
आता विदशा निवडतांना रुलींग मधिल मंगळ, राहु व केतु चा विचार करावा लगेल कारण ते रुलींग मध्ये बुधापेक्षा वरच्या दर्ज्याचे ग्रह आहेत.
मंगळ 9 । 2, 9 केतु प्रमाणे (केतुच्या नक्षत्रात) तसेच केतु मंगळाच्या नक्षत्रात. केतु सप्तमात असुन शुक्राच्या राशीत व शुक्र रवी प्रमाणे 11 च कार्येश.
मंगळ व केतु ऑपरेशन, गर्भपात सुचवितात. (25/7/2005 ते 6/8/2005).
पुढील विदशा - राहु केतुच्या नक्षत्रात 7, 2 व 11 चा कार्येश (पुरक भाव) तसेच राहु रुलींग मध्ये कारण तो मंगळाच्या राशीत. (5/8/2005 ते 1/9/2005)
चंद्र - रवी - राहु - बुध : 17/8/2005 ते 21/8/2005
चंद्र - रवी - राहु केतु : 21/8/2005 ते 23/8/2005
रुलिंग मध्ये बुध असल्याने व 5चा व 11चा कार्येश बुध असल्यामुळे दोन कालख़ंड मिळाले. संतती होण्यासाठी आयडियली 9 महिन्यांची गरज असते. असे असतांना असा जवळचा कालखंड का आला व दोन कालखंडांपैकी कोणता निवडावा या द्विधा मनस्थितीत असता सहज गोचरीच्या चंद्रा कडे लक्ष दिले. असे लक्ष्यात आले की 5/6 फेब. ला चंद्र धनु राशीत जाईल. तेथे तो मंगळाशी युती योगात येईल (चंद्र + मंगळ = मासिक पाळी). परंतु त्यावर चतुर्थातील वक्री शनीची 7वी दृष्टी. त्यामुळे मासिक पाळी येण्याची शक्यता नाही. तसेच 7फेब. ला गोचरीचा चंद्र मकर राशीत लाभात जाईल, व तिथे तो सप्तमातील संततीकारक गुरुच्या 5व्या दृष्टीत यईल.
याचाच अर्थ जातक गरोदर असण्याची शक्यता.
मी लागलीच आईला फोन करुन या संबंधी चौकशी करण्यास सांगितले. तिने तिच्या मैत्रिणीला फोने करुन तसे विचारले. तिला काहिच कल्पना नसल्यामुळे तिने तुच्या बहिणीला पटन्याला फोन केला असता तिला कळले की, नुकतेच तिची बहिण डॉक्टर कडे तपासणी साठी जाउन आली होती व तिला, डॉक्टरने, ती गरोदर असल्याचे सांगितले. तसे मला आईच्या मैत्रीणीने फोन करुन सांगताच, तिला वरिल दोन मंगळाचे व राहुचे कालखंड सांगुन, त्या कालखंडात स्वत:ची व बाळाची अधिक काळजी घेण्याचे व जास्त दक्ष राहण्याचे सांगितले.
read the same article in english here
Tweet This
[...] Read the same article in Marathi here. [...]
ReplyDelete