Friday, December 25, 2009

Sun - रवी

"Japakusuma Samkaasham Kashyapeyam Mahadhyuthim Tamorim Sarva Paapagnam Pranathosmi Divakaram"

जपकुसूम समकाशम काश्यपेयम महध्युथिम
तामोरीम सर्व पापाग्नम प्राणथोस्मी दिवाकरम

रवी हा सर्व ग्रहांचा, या आकाशमंडळाचा राजा आहे. रवी जिवन देणारा ग्रह आहे आणि म्हणुन जिवनाला आवश्यक असणार्‍या सर्व बाबी रवीच्या अधिपत्याखाली येतात. रवी उष्ण ग्रह आहे पण याची उष्णता मंगळाप्रमाणे दाहक नसुन ती जगण्यास आवश्यक अशी सुसह्य आहे.

कारकत्व:
1. रवीकडे सर्वभौमत्व असल्यामुळे शासन व अधिकार याचे कारकत्व रवीकडे येते.
2. शरीरातील आत्मा/चेतना शक्ती रवीच्या अधिपत्याखाली येते.
3. शक्ती व आत्म्याचे स्थान ह्रुदय आहे म्हणुन ह्रुदय सुद्ध रवीच्या अंमलाखाली येते.
4. ह्रुदयातील प्रेम, मार्दवता, क्षमाशिलता, आत्मतेज, कर्तृत्वशक्ती, अधिकारीबाबी, नेतृत्व ई. बाबींचा विचार रवी वरुन करतात.
5. सर्व प्रकारच्या रोग प्रतीकारक शक्तींचा विचारही रवी वरुन करतात.

शरीराचे भाग:
1. आत्मा, चेतनाशक्ती, हृदय.
2. सर्व आकाशमालेचा समतोल राखणारा म्हणुन पाठीचा कणा.
3. शरीरातील उष्णता, रोगप्रतीकारक शक्ती, पांढर्‍यापेशींची निर्मीती.
4. रवी प्रकाशदेणारा, जगाचे दर्शन घडवणारा म्हणुन दृष्टी व त्या अनुषंगाने डोळे रवीच्या अंमलाखाली येतात.
5. रवी नियंत्रण करणारा म्हणुन, शरीराचे नियंत्रण करणारा मेंदु व मेंदुतील सर्व नियंत्रण केंद्रे रविच्या अंमलाखाली येतात.
6. रवी शक्ती निर्मीती करणारा ग्रह म्हणुन शरीरात निर्माण होणारी उर्जा रविच्या अंमलाखाली येते.

गुण:
शुद्ध सात्वीक निर्व्याज्य प्रेम, अधिकारी वृत्ती, नेतृत्व गुण, कर्तुत्व, आनंदी, क्षमाशिल, कार्यमग्न, मर्यादाशिल, उत्साही, निर्भिड वृत्ती, दिमाख, मानसन्मान, विश्वासु, निरोगी, ईश्वरभक्ती, सत्यवादी, मृदुहृदयी, न्यायी, शासक, बलवान.

व्यवसाय:
1. रवी राजा म्हणुन सरकारी नोकर, शासकीय संस्था
2. रक्षक, संरक्षण व्यवस्था
3. उर्जा निर्मीती क्षेत्र/केंद्र
4. नियंत्रण कक्ष इ. ठिकाणी नोकरी/व्यवसाय
5. रवी जीवन देणारा म्हणुन अन्नधान्य कोठारे, शिधावाटप यंत्रणा, किराणा माल, गहु तांदुळ कडधान्य व्यवसाय, हॉटेल व्यवसाय, कॅंटिन इ.
6. रवी रोगप्रतीकारक शक्तीचा कारक म्हणुन लस उत्पादन, औषधी उत्पादन व तत्संबंधी व्यवसाय/नोकरी, डॉक्टर/कंपाउंडर.
7. सर्व प्रकारची उर्जा निर्मीतीची साधने, जनरेटर्स, विद्युत निर्मिती केंद्रे, प्रकाश साधने इ.

No comments:

Post a Comment